चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
रामपूर (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मीबाई लक्ष्मण वर्पे (वय - ९६) यांचे शुक्रवारी सहा मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत सरपंच व शेतकरी कामगार पक्षाचे खंदे समर्थक लक्ष्मण वर्पे यांच्या त्या पत्नी तर विद्यमान उपसरपंच व बागिलगे (ता. चंदगड) येथील रवळनाथ विकास सेवा संस्थेचे उपाध्यक्ष आप्पाजी वर्पे यांच्या त्या मातोश्री होत. तर उद्योजक अमित वर्पे यांच्या त्या आजी होत. अंत्यसंस्कारा प्रसंगी माजी मंत्री बरमूअण्णा पाटील, एम. जे. पाटील, गोपाळराव पाटील, तानाजी गडकरी, विलास पाटील, विलास नाईक, पांडुरंग बेनके यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींचा सहभाग होता. शिवनगे येथील अनंत पाटील (पाटबंधारे शाखाधिकारी), कृष्णा पाटील (तांबुळवाडी), विष्णू काजीर्नेकर (कुर्तनवाडी) यांच्या त्या सासू होत.

No comments:
Post a Comment