रामपूर येथील प्राथमिक शिक्षक बाबुराव वरपे यांना डॉ. जे. पी.नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार' जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2026

रामपूर येथील प्राथमिक शिक्षक बाबुराव वरपे यांना डॉ. जे. पी.नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार' जाहीर

 

बाबुराव वरपे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        रामपूर (ता. चंदगड) येथील नागरिक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागिलगे शाळेतील अद्यापक बाबुराव वरपे यांना सन - २०२६ सालासाठी देण्यात येणारा पद्मभूषण डॉ. जे. पी.नाईक गुणवंत शिक्षक हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारेचे आजरा येथे वितरण करण्यात येणार आहे.

     बाबुराव वरपे यांच्या गेल्या ३२ वर्षे सेवाकाळातील उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेवून 'त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व क्रिडा प्रतिष्ठान आजरा' यांचेकडून प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पद्मभूषण डॉ.जे.पी.नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार' जाहीर करणेत आला आहे.श्री वरपे यांनी आपल्या ३२ वर्षे सेवा काळांत विविध शाळा जिल्हा व राज्यस्तरावर समृद्ध व आदर्श करणे मध्ये भरीव योगदान दिले आहे तसेच गरीब ,गरजू विद्यार्थी व भटक्या वंचित समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. तसेच वृक्षारोपण व संवर्धन ,ऊसतोडणी व वहातूक कामगारांच्या मुलांचे शिक्षणासाठी प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप व अभ्यास वर्ग, भटक्या समाजाला सदैव मदतीचा हात, साक्षरता वर्ग असे अनेक उपक्रम स्वखर्चाने राबवले आहेत.

    यापुर्वीही त्यांना जि. प. कोल्हापूर कडील आदर्श शिक्षक पुरस्कार सह शासनाचे व विविध सेवाभावी संस्थांचे २५ पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत.ऑक्टोबर २०२५ मध्ये सत्यमेव सेवा फौंडेशन महाराष्ट्र राज्य -मुंबई चा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय 'शिक्षक रत्न 'पुरस्कार महाराष्ट्र राज्यातून शिक्षण क्षेत्रासाठी एक असणारा मिळाला आहे.याबरोबर महात्मा फुले प्रतिष्ठान कोल्हापूर -पुणे चा महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२५ मिळाला आहे. सदर पुरस्कार मुळे त्यांच्या नावलौकिकात भर पडली आहे. अशा शिक्षण क्षेत्रासाठी व समाजाच्या विकासासाठी सदैव भरीव योगदान देणाऱ्या शिक्षकाला यावर्षीचा प्रतिष्ठेचा 'पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक गुणवंत शिक्षक 'पुरस्कार जाहीर झालेबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांचे हस्ते पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक सभागृह आजरा येथे रविवार दि. ५ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होत आहे.

No comments:

Post a Comment