
महिला दिन कार्यक्रमात बोलताना प्रा. विद्या शिंदे, शेजारी भाग्यश्री पाटील व इतर शिक्षिका.
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयातील सर्व महिला अध्यापिकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अध्यापिका विद्या डोंगरे पाटील होत्या. कार्यक्रमात महिलांच्या कार्याचा गौरव करताना प्रा. विद्या शिंदे म्हणाल्या, “स्त्री ही केवळ घराची शोभा नाही, तर समाजाच्या प्रगतीची शक्ती आहे. आजच्या काळात स्त्रियांनी शिक्षण, विज्ञान, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध क्षेत्रांत आपले भक्कम अस्तित्व निर्माण केले आहे.”
महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय योगदानाचा सन्मान करणे, स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणे, महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रेरणा देणे ही या दिवसाची मुख्य उद्दिष्टे असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात विद्या डोंगरे पाटील यांनी “महिलांचा सन्मान, समानता आणि स्वातंत्र्य यांचा आदर करणे हीच महिला दिनाची खरी भावना आहे,” असे मत व्यक्त केले.
यावेळी विद्यालयाचे ग्रंथपाल शरद हदगल यांनी महिला साहित्यिकांच्या ग्रंथांचे विशेष ग्रंथप्रदर्शन मांडले होते. या प्रदर्शनाला शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे, वैशाली पाटील, वर्षा पाटील, सीमा कोळी, भाग्यश्री पाटील, साधना भोसले, प्रियाराणी बुरुड, संजय साबळे, ओंकार पाटील, गजानन तरवाळ, आकाश चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शरद हदगल यांनी मानले.
No comments:
Post a Comment