चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
दि न्यु इंग्लिश स्कुल व न. भु. पाटील ज्युनि. कॉलेज चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सुवर्ण महोत्सव कार्यक्रमानिमित्त माजी विद्यार्थी मेळावा विद्यालयाच्या गोगटे हॉलमध्ये आयोजन केल्याची माहीती प्राचार्य आर. पी. पाटील यांनी दिली.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जी. एस. पाटील रहातील. रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, खेडूतचे संचालक के. एस. माळवे व नरसू पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. यासह प्रा. श्रीमती के. आर. जोशी, प्रा. आर. पी. पाटील, प्रा. एस. एम. करोशी, प्रा. एस. आर. देशमुख, प्रा. के. जी. शिरोडकर, प्रा. डी. के. कदम, प्रा. सौ. एम. एम. आमणगी, प्रा. एम. एम. जमादार, एल. डी. कांबळे, एम. एस. मुळीक, व्ही. आर. काजिर्णेकर, बी. वाय. सुतार, यु. एस. शिंदे, एन. एस. पाटील, डी. एम. बेनके, एस. व्ही. गुरबे, बी. डी. मोरे, डी. डी. पाटील, पी. आर. बसरीकट्टी, जी. एस. पाटील, व्ही. डी. सडेकर, व्ही. डी. देसाई, ए. व्ही. सुतार, टी. जी. पाटील हे प्रमुख उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांच्यासह सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी केले आहे.
.jpeg)
No comments:
Post a Comment