तेऊरवाडी येथे ग्रामपंचायत फंड व लोकसहभागातून रस्त्यांची कामे, ग्रामस्थांतून समाधान - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2026

तेऊरवाडी येथे ग्रामपंचायत फंड व लोकसहभागातून रस्त्यांची कामे, ग्रामस्थांतून समाधान



कोवाड : सी एल वृत्तसेवा 

   तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे नवीन वसाहतीत लोकसहभाग व ग्रामपंचायत फंडातून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लोक सहभागाला ग्रामपंचायत फंडाची साथ मिळाल्यामुळे   ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

    तेऊरवाडी प्राथमिक शाळेपासून पूर्वेकडील बाजूस नवीन वसाहतीत अनेक घरे झाली आहेत. पूर्व बाजूकडील या घरांना जाण्यासाठी चिखलाच्या पायवाटे शिवाय दुसरा पर्याय नव्हता. या रहिवाशांची होत असलेली पावसाळ्यातील कुचंबणा पाहून उपसरपंच प्रकाश दळवी यांच्या पुढाकाराने नवीन रस्ता करण्याचा प्रस्ताव पुढे आला. ग्रामपंचायत फंडातून पूर्ण रस्ता करणे अशक्य असल्याने परिसरातील नागरिकांनी लोकसहभागातून आर्थिक मदत जमा केली. या विकास कामाला सरपंच मनीषा मोहन पाटील, उपसरपंच प्रकाश दळवी, या विभागाच्या सदस्या सुरेखा यशवंत पाटील, ग्रामपंचायत अधिकारी संतोष गुरव सहकार्याचा हात पुढे करत ग्रामपंचायत फंडातून हातभार लावला. या कामी मार्गदर्शक वाय. बी. पाटील यांच्या सहकार्याने रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. नवीन रस्ता होत असल्यामुळे पावसाळ्यातील  चिखलाच्या पायवाटेतून जाण्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे. नुकतेच या रस्त्याचे जेसीबी यंत्राद्वारे रुंदीकरण सपाटीकरण करून पुढील कार्यवाही ग्रामपंचायत मार्फत केली जात आहे. रस्ता कामाच्या शुभारंभ  प्रसंगी सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामपंचायत अधिकारी येथील रहिवासी व मुंबई पोलीस चंद्रकांत पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थांची उपस्थिती होती. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून  गावात नवीन स्मशान शेडचे काम चालू असल्याची माहिती उपसरपंच प्रकाश दळवी यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment