धामणे क्रिकेट संघ ठरला महामानव चषकाचा मानकरी, कालकुंद्री येथे आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2026

धामणे क्रिकेट संघ ठरला महामानव चषकाचा मानकरी, कालकुंद्री येथे आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न



कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

   कालकुंद्री (ता. चंदगड) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भीम क्रांती सांस्कृतिक युवा मंचच्यावतीने इयत्ता पहिली ते सातवी साठी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे पार्थ गुरव, आराध्या गोपाळ कांबळे, दैविक भरत पाटील, रुपल गोपाळ कांबळे व पार्थ हरीश मुतकेकर यांनी क्रमांक पटकावले. त्यांना रोख रुपये ३००१, २००१, १५०१, १००१, ७०१ व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.  याशिवाय  ९ एप्रिल पासून आठ दिवस सुरू असलेल्या महामानव चषक खुल्या हाप पीच क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील तब्बल ४२ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक धामणे (ता. बेळगाव), द्वितीय क्रमांक अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज), तृतीय क्रमांक तळगुळी (ता. चंदगड) व शिस्तबद्ध संघ म्हणून कलमेश्वर क्रीडा मंडळ कालकुंद्री यांनी यश मिळवले. विजेत्यांना रोख रुपये ७००१, ५००१, ३००१ व चषक तसेच वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.

 स्पर्धेचे बक्षीस वितरण सेवा संस्था चेअरमन अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक ए. डी. कांबळे (माडखोलकर महाविद्यालय चंदगड) उपस्थित होते. प्रमुख उपस्थित चंदगड पंचायत समिती सभापती विलास नाईक, पंस. सदस्य मधुकर आंबेवाडकर, सरपंच छाया राजाराम जोशी, राजगोळी बुद्रुक चे पोलीस पाटील काशिनाथ कांबळे, विलास शेटजी, जे. एस. पाटील, जयवंत पाटील, शरद जोशी, पोलीस पाटील संगीता कोळी आदींच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर रात्री स्वरांगण म्युझिशियन सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.

No comments:

Post a Comment