कौलगे येथील निवृत्त जवान भीमराव आतवाडकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2026

कौलगे येथील निवृत्त जवान भीमराव आतवाडकर यांचे निधन

भीमराव यलाप्पा आतवाडकर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

कौलगे (ता. चंदगड) येथील निवृत्त जवान भीमराव यलाप्पा आतवाडकर (वय 65) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (दि. 18) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते गावातील तंटामुक्त कमिटीचे माजी अध्यक्ष होते. तसेच निवृत्त जवान संघटनेमध्ये ते सक्रिय कार्यकर्ते होते. तसेच गावातील देवस्थान कमिटीमध्ये त्यांचा सहभाग हिरारीने होता. कोल्हापूर येथील शिक्षक अरुण आतवाडकर यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment