नंदुकुमार रेडेकर यांचा ‘डिजिटल डिस्ट्रिक्ट रिपोझिटरी’ उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2026

नंदुकुमार रेडेकर यांचा ‘डिजिटल डिस्ट्रिक्ट रिपोझिटरी’ उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर सन्मान

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या ‘डिजिटल डिस्ट्रिक्ट रिपोझिटरी’ या महत्त्वपूर्ण प्रकल्पांतर्गत उल्लेखनीय कार्याबद्दल नंदुकुमार (नंदू) रेडेकर यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा सन्मान २५ जून २०२६ रोजी सांस्कृतिक स्त्रोत व प्रशिक्षण केंद्र (CCRT), नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
    श्री. रेडेकर यांनी कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित १०० हून अधिक ऐतिहासिक कथा, स्वातंत्र्यसैनिकांची माहिती आणि महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचे संशोधन व दस्तऐवजीकरण केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे हा मौल्यवान इतिहास भारत सरकारच्या डिजिटल पोर्टलवर उपलब्ध झाला आहे.
        स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचे संवर्धन आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी त्यांनी केलेले योगदान अत्यंत मोलाचे मानले जात आहे. त्यांच्या संशोधनामुळे नव्या पिढीपर्यंत स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणादायी कथा पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे. श्री. नंदू रेडेकर यांना मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन!

No comments:

Post a Comment